शेतक-यांना मासिक वाटप
ग्रामपंचायत कणेरी येथे शेती बद्दल शेतक-यांना माहिती व्हावी व शेती करताना कोण्ात्याही प्रकारची अडचण्ा येवू नये. यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत यांच्या सहाय्याने शेतक-यांचे प्रश्न जाणून त्यांना मासिक वाटप करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती
सर्वगुण्ा, सदगुणांचा उपासक, छ. शाहू महाराज जयंती मौजे कणेरी या गावामध्ये तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत वतीने दि. २६ जून रोजी मोठया उत्साहाने साजरी करण्यात येते. या थोर पुरूषाने २ एप्रिल
१८९४ साली कोल्हापूर प्रशासनाची सुत्रे हाती घेतली. गोरगरीब, दीन-दलितांचा राजा, विदवानांचा चाहता, कलावंताचा भोक्ता, स्थिर चित्ताने धोरण्ा आख्ाणारा नेता म्हण्ाजे छत्रपती शाहू महाराज, कुलकर्णीशाही नष्ट करून बलुते पध्दती नष्ट केली. प्राथ्ामिक शिक्ष्ाण्ा सक्तीचे करून वसतिगृहे उभारली. या थोर पुरूषाने सर्व सामान्यांना आरक्ष्ाण्ा देवून आर्थिक स्थिती सुधारली या थोर राजाची जयंती तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत व सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येवून उत्साहाने साजरी केली.
स्वातंत्र्य दिन
१५ ऑगष्ट हा दिवस भारत देशामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट रोजी महात्मा गांधी तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने ध्यजारोहनाचा कार्यक्रम केला. गावातील मंडळांनी व सहकारी संस्थांनी ध्वजारोहन केले. ध्वजारोहनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शाळेतील मुलांनी देशासाठी शहिद झालेल्या हुतात्म्यांबद्दल व देशाबद्दल भाषणे सादर केली व देश्ा सेवा साजरी केली. यांनतर लहान मुलांना गोळया वाटण्यात आल्या व नंतर महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष्ा यांनी आपले मनोगत व्यक्त करून १५ ऑगस्ट हा दिवस साजरा केला.
एक गाव एक गण्ापती
लोकांमध्ये एकीची भावना निर्माण्ा व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेश्ा उत्सव हा सण्ा सुरू केला. या गणेशोत्सवानिमित्त सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येउन सण्ा अत्यंत
उत्साहाने साजरा करतात. या उत्सवानिमित्त कणेरी गावामध्ये एक वेगळा आदर्श्ा निर्माण्ा केला. तो म्हण्ाजे एक गाव एक गण्ापती, मौजे कणेरी येथील ग्रामपंचायत वतीने गावातील सर्व मंडळांना एकत्र बोलविण्यात आले व एक गाव एक गण्ापती बसविण्याचे ठवविले. गणेश्ा मुर्तीची प्रतिष्ठापना करून सर्व जातीतील लोकांनी गणेश्ा मुर्तीची रोज आरती केली व विसर्जनादिवशी अत्यंत शिस्तबध्दपध्दतीने मिरवणूक पार पाडली या मिरवणूकीस पोलीस बंदोबस्ताची गरज भासली नाही. गावातील ग्रामसुरक्षा दलामार्फत गणेशचतुर्थी शांततेत पार पाडली.
हुंडाबळी व स्त्रीभ्रुण्ा हत्या
मौजे कणेरी गावामध्ये तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रीभ्रुण्ा हत्या व बालविवाह रोख्ाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदरच्या कार्यक्रमासाठी मा. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष्ा यांच्या अध्यक्ष्ातेखाली हुंडाबळी व स्त्रीभुष्ा हत्या या विषयावरती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये मा. प्रतिमा सतेज पाटील यांनी ख्ाबरजनक माहिती देऊन कणेरी मधील माता भगिनींना लेक वाचवा अभियाना अंतर्गत मार्गदर्श्ान केले. सध्या या गावामध्ये हुंडा बळी व स्त्रीभ्रुण्ा हत्येचे प्रमाण्ा कमी झाले आहे, या कार्यक्रम गावातील सर्व बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.
साक्ष्ारता दिन
मौजे कणेरी गावात एकूण्ा ७२ निरक्ष्ार आहेत. या सर्वांना साक्ष्ार करून संपूर्ण गाव साक्षर करण्याच्या हेतूने महात्मा गांधी तंटामुक्त समितीने गावातील निरक्ष्ार ग्रामस्थांना साक्ष्ार करण्याचे ठरविले. गावातील प्रत्येक निरक्ष्ाराला निदान एस.टी. बसचा बोर्ड वाचता यावा व आपली सही करता यावी यासाठी बुध्ावारी व रविवारी या दोन दिवशी सायं. ७ ते १० या वेळेत रात्रवर्ग सुरू करण्यात आले. काही ग्रामस्थांना वयाची लाज वाटत होती. पण्ा अक्षर वळविण्याची गोडी लागल्यावर ते शाळेमध्ये दाख्ाल झाले. सर्वजन अगदी न चुकता नियमित शाळेत येत होते. त्यामुळे ग्रामस्थांना एस.टी. बोर्ड वाचता येऊ लागला. आपली स्वत:ची सही करता येऊ लागली. त्यांच्यात एक सुख्ाद व आत्मविश्वासाचे वातावरण्ा निर्माण्ा झाले आणि शिक्ष्ाणाचे महत्व त्यांना पटले.
रमजान ईद
मुस्लीम धर्मीयांमध्ये रमजान ईद हा फार मोठा व पवित्र सण्ा मानला जातो. सकाळी सरपंच व ग्रामपंचायत व इतर सदस्य यांनी मुस्लीम बांध्ावांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मुस्लीम बांध्ावाच्या मध्ये अतिश्ाय आनंदी वातावरण्ा निर्णाण्ा झाले. त्यामुळे सर्व धर्मीयामध्ये जातीय सलोखा दिसुन आला. हिंदु मुस्लिम यांच्यामधील तेढ कमी होण्यास यामुळे मदत होते. या दिवशी गावातील सर्व धर्माच्या लोकांना बोलावून मुस्लिम धर्मातील लोकांनी मशिदीमध्ये खिरीचा प्रसाद दिला. त्याचबरोबर सर्व धर्मातील लोकांनी मुस्लिम बांध्ावांना अलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
दारू बंदी व व्यवसाय परिवर्तन
मौजे कणेरी ता. करवीरमध्ये गांधीगिरी पध्दतीने दारूबंदी करण्यात आली. गावामध्ये अनेक वर्षांपासुन सुरू असलेले विना परवाना दारूचे दुकान महात्मा गांधी तंटामुक्त समितीने फक्त विनंती करून बंद करण्यास भाग पाडले. तसेच उभी बाटली कोण्ाताही गाजावाजा न करता आडवी झाली आणि कुटुंबामध्ये तसेच महिलांमध्ये याचा फार आनंद झाला. गावातील या महत्वपुर्ण्ा कामगिरीमध्ये तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले आणि एका संघर्षाला विजय मिळाला. सध्या दारू पिणारा मनुष्य हा सेंट्रीगचे काम करत असून त्याला दारूपासुन होणारी हानी व आपल्या संसाराला दारूच्या पैशापासुन सुख लागत नाही हे कळाले आता त्याचे कुटुंब सुखात आहे.
महात्मा गांधी जयंती
अहिंसा, सत्याग्रहाचा प्रणेता, राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म पोरबंदर गुजरात येथे झाला. त्यांनी परदेशात जाउन वकिलीचे शिक्षण्ा पुर्ण्ा केले. सत्याग्रह व स्वदेशीच्या वापर, उपोषन व हरताळ करून परकियांना देश सोडण्यास भाग पाडले. चलेजाव चळवळ, दांडी यात्रा, आमरण्ा उपोषन या मार्गानी हिंदूस्थान स्वतंत्र केला. शांततेच्या मार्गाने लढा देणा-या या थोर पुरूषाची जयंती तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत मार्फत सकाळी ८.३० वा ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्त अध्यक्ष्ा, सरपंच व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत महात्माजींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला. जयंतीनिमित्त गावातील सर्व अवैध ध्ांदे बंद करण्यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आला.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत संपर्ण्ा गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी
महात्मा गांधी तंटामुक्त समिती, तरूण्ा मंडळे, सर्व ग्रामस्थ, महिला बचत गटांनी सक्रीय भाग घेऊन गाव आदर्श्ा बनविण्यासाठी प्रयत्न केला. या कालावधीमध्ये शासनाच्या नियमानुसार प्रत्येक आठवडयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले, तसेच या अभियानामध्ये के.आय.टी कॉलेज कोल्हापूर, यांच्या वतीने गावातील नाले, बंधारे प्रमुख्ा रस्ते, साफ, सफाई, तसेच शोष्ाख्ाड्डे ख्ाण्ाण्यात आले, व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान साजरा करण्यात आला. विशेष्ा उल्लेखनीय बाब म्हण्ाजे या परिश्रमाचे फळ म्हणुन गावाला तालुक्यात प्रथ्ाम क्रमांक मिळाला, यानंतर जिल्हास्तरावर नंबर येण्यासाठी गावकरी एकजुटीने प्रयत्न करताना दिसुन येत आहेत.
बचत गट निर्मिती व सक्षमीकरण्ा
खेड़ोपाडी भेडसवणारी भविष्य काळात उग्र रूप धारण्ा करणारी भारत देशाला लागलेली किड म्हण्ाजे बेरोजगारी, महात्मा गांधी तंटामुक्त समितीमार्फत ४ आक्टोबर रोजी व्यवसाय प्रशिक्ष्ाण्ा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, सदर प्रशिक्ष्ाणासाठी गावातील ४२ शिक्षीत युवक युवती उपस्थित राहिले, यात १० वी, १२ वी व पदवीनंतरचे प्रशिक्ष्ाण्ा व मार्गदर्श्ान करण्यात आले, युवतीसाठी शिवण्ाक्लास, भरतकाम पार्लरकोर्ससारखे विविध्ा कोर्सचे प्रशिक्ष्ाण्ा देण्यात आले. सदर मार्गदर्श्ानामुळे ब-याच युवकांनी आय.टी.आय कोर्सकडे धाव घेतली. तर काहींनी स्वत:चा बिझनेस करण्याचे ठरविले. अशा मार्गदर्श्ानाने भारत नक्कीच विकसित देश्ा बनू शकेल. या कार्यक्रमास तंटामुक्त समिती, ग्रामपंचयातचे सर्व पदाधिकारी व गावातील सर्व नागरीक उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरू जयंती
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून ग्रामपंचायत येथे तंटामुक्त समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने पंडित जवाहर लाल नेहरू जयंती साजरी करण्यात आली. तसेच सदर दिवशी प्राथ्ामिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना एकत्र बोलविण्यात आले होते. या दिवशी प्राथ्ामिक शाळेत सरपंच व इतर सदस्य उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या पालकांना शैक्ष्ाणिक जीवनाकडे काटेकोरपणे लक्ष्ा द्यावे, त्यांना लहान वयात शेतीचे काम लावू नये. त्यांचा शिक्षाणाचा पाया कमकुवत होऊ नये असे सर्व पालकांना मार्गदर्श्ान केले.
एडस् निर्मुलन दिन
सद्य परिस्थितीत जगाला भेडसावणारा भयानक रोग म्हण्ाजे एड्स. जागतिक एड्स दिनानिमित्त गावमध्ये जनजागृती करण्यात आली. तंटामुक्त समिती व ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील सर्व लहान थोरांत एड्स या रोगाबद्दल स्लाईड शो दाख्ाविण्यात आला. जेणे करून गावातील तरूण्ा वर्गाला या रोगाचा प्रसार व परिणाम कोण्ात्या स्वरूपात होते याची सविस्तर माहिती मिळाली. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य व तरूण मंडळाचे कार्यक्रते उपस्थित होते.
महानिर्वाण्ा दिन
ड़ॉ. बाबासाहेब आबेडकर स्मृतिदिन मौजे कणेरी ता. करवीर येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत यांच्या अंतर्गत जातीय व धार्मिक सलोखा राबविण्याच्या दृष्टिकोनातून हरीजन वस्तीमध्ये जाऊन महानिर्वाण्ा दिन साजरा करण्यात आला. गावातील इतर हिंदु धर्मिय ग्रामस्थ्ा व मान्यवर सरपंच तंटामुक्त सदस्य यावेळी उपस्थित होते. यामुळे हरीजन वस्तीमध्ये ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण्ा निर्माण्ा झाले.
ग्राम सुरक्षा दल स्थापन व गस्त
मौजे कणेरी ता. करवीर गावामध्ये तंटामुक्त समिती अंतर्गत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून यात २५ सदस्यांनी निवड करण्यात आली आहे. या दलाकडून गावमध्ये रात्रीची गस्त घालण्यासाठी उदात्य हेतू ध्यानात ठेवून काम करावे. यासाठी शपत घेण्यात आली. या सदस्यांना त्यात्या प्रभागातील लोक रात्री गस्तीसाठी साथीला देण्याचा निर्ण्ाय झाला. ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना ग्रामपंचायत कणेरी यांच्या कडून गण्ावेश देण्यात आला. करवीर पोलीस स्टेश्ानचे निरीक्ष्ाक यांच्या कडून सदस्यांना नेमके प्रशिक्ष्ाण्ा देण्यात आले.
जेष्ठ नागरीकांच्या समस्या सोडविणे
मौजे कणेरी ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे जेष्ठ नागरीकांच्या समस्या सोडविणेचा कार्यक्रम झाला. यावेळी ड़ॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट मार्फत सौ. प्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते जेष्ठ नागरीकांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. तसेच बस व एस.टी. पास योजनेचा लाभ देण्यात आला. गावातील सर्व जेष्ठ मंडळींना बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शासना अंतर्गंत वेगवेगळया योजनांचा लाभ देण्यात आला.
विद्रुप झालेली मालमत्ता पुर्ववत करणे
कणेरीमध्ये अति प्राचीन काळातील मंदिर आहे. सदर मंदिराचा ग्रामस्थ्ा शांत बसणेसाठी तसेच ध्यान करणेसाठी या मंदिराचा उपयोग करतात. म्हणूनच तंटामुक्त समिती व ग्रामपंचायतीच्या मार्फत सदर दत्त मंदिराचा जिर्णोध्दार, रंगरंगोटी, स्वच्छता केलेली आहे. त्यांची देख्ाभालाची जबाबदारी तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायतीने तसेच ग्रामस्थांनी स्वत: उचलली आहे. हे मंदिर म्हण्ाजे भक्तीचा एक ठेवाच आहे.
मोहरम
मुस्लिम धर्मियांमध्ये ताबुत सण्ा म्हण्ाजे मोहरम होय. या उत्सवामध्ये ग्रामपंचायतने अगदी उत्साहपूर्वक सहभाग दर्श्ाविला. या समितीने सर्व हिंदु व इतर धर्मियांच्या बांध्ावाना एकत्रीत करून मुस्लिम बांध्ावांचा सण्ा मोठ्या आनदाने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील संरपंच यांच्या शुभहस्ते मुस्लिम दैवत पीर या देवतांचे पूजन करण्यात आले. हारतुरे घालुन श्रीफळ वाढविण्यात आले. हिंदु लोकांनी अगदी उत्साहपूर्वक मुस्लिम बांध्ावांच्या या उत्सवामध्ये सहभाग दर्श्ाविला. सदरचा उत्सव विना पोलिस बंदोबस्ताशिवाय ग्राम सुरक्षा दलाने शांततेने पार पाडला.
वृक्षारोपण्ा व वनसंवर्ध्ान
पृथ्वीवरील सर्वांत महात्वाची गोष्ट म्हण्ाजे झाडे होय. कारण्ा कार्बनडायऑक्साईड शोषूण्ा ऑक्सीजन निर्माण्ा करण्याची ताकद झाडांकडे असते. जमिनीची धूप होत नाही. मोसमी वारे रोख्ाले जातात. वेगवेगळया औषधांचा मनुष्यांस उपयोग होतो. वातावरण्ा थ्ांड व अल्हाददायक राहते. म्हणूनच तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत घेण्यात आलेल्या नवजीवन उपक्रमामध्ये वृक्षारोपण्ा हा सर्वात महत्वाचा उपक्रम गावातील सर्व तरून मंडळे सहभागी होते.
सावित्रीबाई फुले जयंती
मौजे. कणेरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. मराठी शाळेमध्ये मा. सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष्ा व सर्व सदस्य शाळेतील शिक्ष्ाक, शिक्षिका,
विद्यार्थी यांनी व गावातील उपस्थितीत नागरीकांनी सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील व्याख्यान देताना "राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील तसेच सोनिया गांधी यासारख्या महिला देश्ा उभारणीसाठी कार्य करत आहेत. यांचा आदर्श्ा सर्व महिलांनी घेउन आपण्ाही या पध्दतीने कार्यरत व्हावे" असे सांगण्यात आले. अशा पध्दतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
हायटेक चावडी
कणेरी ता. करवीर येथे ब-यांच वर्षांपूर्वीची गावचावडी व मंडल कार्यालय अतिश्ाय जीर्ण्ा अवस्थेत होते. पण्ा गेल्या सन २००८-२००९ पासुन लोकवर्गणीतुन चावडी बांध्ाण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याप्रमाणे गावामधुन लोकवर्गणी जमा करूण जीर्ण्ा झालेली गावचावडी व मंडल कार्यालय पाडून एक हायटेक चावडी व मंडल कार्यालय पुर्ण्ात्वास आले. या जिल्ह्यातील पहिली हायटेक चावडी दि. ७-१-२०१० साली मा. नामदार श्री हर्ष्ावर्ध्ान पाटीलसो पालकमंत्री कोल्हापूर यांच्या शुभहस्ते व प.पु. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्श्ानाखाली तसेच मा. आमदार सतेज पाटील, श्री दिलीप बंडसो-विभागीय आयुक्त पुणे, श्री. लक्ष्मीकांत देशमुख्ासो जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे प्रमुख्ा उपस्थित उदघाटन करण्यात आले.
स्वामी विवेकांनंद जयंती
नरेंद्र विश्वनाथ्ा दत्त म्हण्ाजेच स्वामी विवेकानंद होय. भारतीय संस्कृतीचे भाष्यकार त्यांनी हिंदु धर्माचा प्रसार केला ते अतिश्ाय बुध्दिमान होते. या थोर विचारवंताची जयंती तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत मार्फत अतिश्ाय उत्साहाने साजरी करण्यात आली. तरूण्ा जर चुकीच्या मार्गावरून जात असेल तर त्याला वेळीच सावरावे सासाठी गावमध्ये व्यसन मुक्ती या विषयांवर एक व्याख्यान आयोजित केले होते. गावामध्ये गुटखा बंदी करून एक आदर्श्ा निर्माण्ा केला.
आंतर जातीय विवाह
मौजे. कणेरी. ता. करवीर गावामध्ये तंटामुक्त समिती स्थापन झाल्यापासुन वेगवेगळे नविन उपक्रम या समिती अध्यक्ष्ा, ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांच्या विचारविनीमयाने सर्व निर्ण्ाय घेतले जातात. त्यातील एक महत्वाचा भाग म्हण्ाजे आंतरजातीय विवाह होय. समाजात आंतरजातीय विवाह झाल्यास जातीध्ार्माच्या बेड्या तुटल्या जातील व मानव नावाची एकच जात या समाजात राहिल तसेच आपापसातील भेदभाव, हेवेदावे व तंटे सुधारण्यासाठी आंतरजातीय विवाह हा एकमेव उपाय वाटतो. त्यासाठी तंटामुक्त समितीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गावामध्ये जर कोणी आंतरजातीय विवाह करणार असेल तर त्यास येणा-या सर्व अडचणी सोडविणे व निधी गोळा करून त्यांच्या संसारासाठी लागणारे साहित्य देणे वगैरे ठरले.
मकर संक्रांत
मकरसंक्रांती निमित्त तंटामुक्त समिती व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने मकर संक्रांत साजरी करण्यात आली. यामध्ये तिळगुळ देण्यासाठी सर्व धर्मिय बांध्ावांना ग्रामपंचायतीने निमंत्रित करून सर्वांना अलिंगन देवून तिळगुळ देण्यात आले व जातीय सलोखा कायम राहिल याबद्दल सर्व धर्मिय लोकांनी तंटामुक्ती समितीस अभिवचन दिले. तसेच महिला बचत गटांना बोलावून सर्व धर्मातील लोकांना तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामुळे महिला बचत गटात व गावातील सर्व ग्रामस्थांमध्ये एकीचे वातावरण्ा निर्माण्ा झाले.
प्रजासत्ताक दिन
ग्रामपंचायत कार्यालयासमोर मा. सरपंच यांचे हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यानंतर झालेल्या ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी निर्मलग्राम कार्यक्रमा मध्ये कणेरी गावाला घवघवीत यश मिळाले असुन गावात निर्मल ग्राम पुरस्कार मिळाल्याची वार्ता सांगितली. तसेच सामितीचे अध्यक्ष्ा श्री मधुकर दत्तात्रय पाटील यांनी तंटमुक्त समिती कार्याचा आढावा घेतला.
शालेय पोषण्ा आहार
मौजे. कणेरीवाडी गावामध्ये एक प्राथ्ामिक शाळा, अंगण्ावाडी व शेजारी मारूती मंदिर, पावतका मंदिर व माध्यमिक हायस्कूल आहे. विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळी सकस व चांगला आहार मिळावा म्हणून तंटामुक्त समिती व ग्राम पंचायतीच्या मार्गदर्श्ानाखाली आहार पुरविला जातो. या निमित्त २ फेब्रुवारी रोजी गावातुन विद्यार्थ्यांची आनंदी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये गावातुन सर्व कडधान्य गोळा करू व तंटामुक्त समिती व ग्रामपंचायीच्या वतीने अंगण्ावाडी व शाळेमध्ये सर्व बालक सदढ व निरोगी बनली आहेत.
सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमन होऊ न देणे
सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमन हटाव मोहिम राबविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमन झाले होते हे लक्षात घेवून महात्मा गांधी तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने अतिक्रमन धारकांना नोटिस देण्यात आल्या. थोडया व्यक्तींनी अतिक्रमण्ान स्वत:हून काढले व ज्यांनी अतिक्रमन काढले नाही ते अतिक्रमन उध्वस्त करण्यात आले. यामुळे कणेरी गावामध्ये सार्वजनिक अतिक्रमन होऊ दिले नाही. अतिक्रमन हटाव मोहिम चालु असताना पोलिस बंदोबस्ताची गरज भासली नाही.
हनुमान जयंती
मौजे कणेरी गावामध्ये श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती निमित्य विद्युत रोषनाई करण्यात आली होती पहाटे पासुन रांगोळी काढणेत आली होती. हॉलमध्ये पताका लावण्यात आल्या होत्या गावामध्ये हनुमान जयंतीचे अतिश्ाय उत्साहाने वातावरण्ा दिसुन आले. सकाळी मंदिरामध्ये आरतीचा कार्यक्रम झाला, यामध्ये तंटामुक्त अध्यक्ष्ा, सरपंच, उपसरपंच, तसेच ग्रा.पं.सदस्य, तंटामुक्त सदस्य व गावातील सर्वधर्मिय नागरिक माहिला भगिनी हजर होत्या. सायंकाळी पालखी सोहळा अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने साजरा करण्यात आला. तसेच ग्राम सुरक्षा दलाचे सहकार्य लाभले, रात्री भजनाचा व महाप्रसाद कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.
महाशिवरात्र
सिध्दगिरी मठ, कणेरी येथे दरवर्षी मोठया प्रमाणावर यात्रा भरविली जाते. या यात्रेसाठी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातुन अनेक भाविक उपस्थित राहतात. या ठिकाणी येणा-या लोकांच्यासाठी निरंतर अन्नछत्र चालविले जाते. तसेच पुर्वीचे ग्रामस्थ्ाजीवन कसे होते हे दाखविण्यासाठी एक अतिभव्य म्युझिअम उभारण्यात आले आहे. तसेच वर्षातुन एकदा गुरूपौर्णिमा, दर महिन्याला सत्संगाचा कार्यक्रम केला जातो व गावमध्ये महाशिवरात्रीचा सण्ा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
छ. शिवाजी महाराज जयंती
राजा हा प्रजेचा पालनकर्ता असतो, उपभोगी नसतो. प्रजेने केलेल्या साम्राज्याचा तो विश्वस्त म्हणून धनी असतो.
तो एक जाण्ाता राजा असतो. कैवारी, पराक्रमी व संकटाला धैर्याने सामोरे जाणारा धर्मरक्ष्ाक असतो. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त मौजे कणेरी गावामध्ये तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने शिवप्रेमी तरूणांनी किल्ले पन्हाळगड येथून शिवज्योत आणली व स.७ वा. या ज्योतीचे स्वागत सरपंच, ग्रा.पं. सदस्य यांनी मिळुन केले. या शिवजयंती निमित्त सायंकाळी ७ वा. मिरवणुक काढणेत आली व गावात सलोख्याचे वातावरण्ा निर्माण्ा करणेत आले.
निर्मल ग्राम कणेरी
मौजे कणेरी ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे निर्मल ग्राम योजना राबविण्यात आली. गाव निर्मल ग्राम होण्यासाठी गावामध्ये ज्यांच्या घरामध्ये शौचालय नव्हती त्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत मदत देऊन शौचालय बांधून देण्यात आले. गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. गाव स्वच्छता करण्यात आली. गावामध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमण्ा होते ते काढण्यात आले. गाव निर्मल ग्राम होण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत गावातील सर्व महिला बचत गट, सर्व तरूण्ा मंडळे यांचे सहकार्य लाभले.
पंचाक्ष्ारी शाळा
मौजे कणेरी वाडी येथे एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला. गावातील चंद्रकांत स्वामी या दानशुर व्यक्तीने स्वत:चे पाच गुंठयामध्ये शाळा बांध्ाली व ही शाळा गावाला भेट देण्यात आली. या शाळेमध्ये सध्या पहिली ते चौथीपर्यंत वर्ग सुरु आहेत. एवढया धाडशी उपक्रमातून या शाळेमध्ये देशासाठी लढणारे जवान तयार होतील. देशासाठी लागणारे हुशार व्यक्ती तयार होतील व आपला देश तसेच आमचे गाव परिपूर्ण्ा असेल यात तीळमात्रही शंका नाही.
ग्रामपंचायत बिनविरोध्ा
गावात चार गटाचे लोक राहतात. जर निवडणूक झाली असती तर दहा लाख्ा खर्च झाले असते. गावातुन सत्तर लोकांनी फॉर्म भरले होते. हिनतेची मर्यादा ओलांडून जगात सर्वत्र चालणारे राजकारण्ा व लोकशाही पायदळी तुडवून काम करणारे राजकारणी यांचा मनस्वी राग असणारे परमपुज्य श्री. अदृश्य काडशिध्देश्वर स्वामी यांनी ७००० ते ८००० लोकसंख्या असणा-या गावतुन लोकसेवेला वाहुन घेतलेल्या व राजकारणाला वेळ देणा-या तेरा सदस्यांची स्वत:निवड करून सर्व जगाला एक चांगला आदर्श्ा घालुन दिला. तसेच या गावातील सोसायटीची निवडणुकही बिनरोध्ा झाली आहे.
जातीय व धर्मिय सलोखा कायम राखणे सर्व धर्म समभाव या युक्तीप्रमाणे मौजे कणेरी ता. करवीर हे महाराष्ट्रातील एकमेव गाव म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण्ा सदर गावात काणताही कार्यक्रम असो, सर्व धर्माचे लोक एकत्र येउन तो अतिश्ाय उत्साहाने साजरा करतात. गावात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. प्रत्येकजण्ा आपल्या व्यवसायात प्राविण्यपूर्ण्ा आहे.
तसेच सर्व शेती ओलीताखाली असल्यामुळे सर्वांची अर्थिक परिस्थिती बेताची आहे. म्हणून गावचा विकास होण्यास वेळ लागला नाही. तंटामुक्त समिती व ग्रामपंचायतीच्या मध्यमातुन अनेक नाविन्यपुर्ण्ा उपक्रम गावात राबविल्यामुळे उस्पृश्ाता नावालाही उरली नाही. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार, गावातील सांड पाण्याचा योग्य निचरा, संपूर्ण्ा गाव हागण्ादारीमुक्त स्वच्छ व सुंदर रस्ते यामुळे अस्पृश्यता ही गावच्या वेशीच्या बाहेर कधी गेली हे कळले सुध्दा नाही.